ताजी बातमी ऑनलाईन टीम
शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मधील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेला आजपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. सुमारे 8 ते 10 लाख भाविक पट्टणकोडोलीमध्ये बिरदेव यात्रेसाठी दाखल झाले आहेत. या अभुतपुर्व यात्रेमध्ये खारीक, खोबरे, भंडाऱ्याची मुक्त उधळली केली जात आहे.
राज्यात मोठी खळबळ होईल, रोहिणीत गडगडाट, मिरगात पेरणी देशात होईल, तांबडं, रस भांडे महागणार, मिरची महागणार, रोगराई कानान ऐकाल, डोळ्यांनी दिसणार नाही, बाळगोपाळ सुखी ठेवील अशी भाकणूक फरांडेबाबा तात्यादेव वायकुळे यांनी वसगडे ता. करवीर येथे विठ्ठल-बिरदेव यात्रेत पालखी उत्सवासमोर केली.
तात्यादेव वायकुळे (फरांडेबाबा) हे शिरसाव (ता. परांडा) येथील आहेत. ते वाकडी, कासेगाव, गुंडवाडीमार्गे वसगडे येथे आले. तलवारीचे पूजन पोलीस पाटील संजय पाटील यांच्या हस्ते झाले. गावातील समस्त धनगर समाज, मानकरी, ग्रामस्थ यांच्या समवेत ते वाजत गाजत आले. यावेळी ढोलाच्या आवाजाने आसमंत दणाणून गेला. भाविकांनी लोकर व पैशाची उधळण केली. त्यानंतर दोन वाजता फरांडेबाबा ‘हेडाम’ सोहळ्यात हातात
तलवारी घेऊन पोटावर वार करीत मंदिरात आले व भाकणूकीस प्रारंभ झाला. यावेळी भंडाऱ्याच्या उधळणीने आसमंत पिवळा धमक झाला होता.
फरांडेबाबांनी डोळे दिपवणारे हेडाम नृत्य करून भाकणूक भाकणुक केली. फरांडे बाबांनी येत्या वर्षाभरात काय होणार याचा अंदाज वर्तवला. त्यानुसार त्यांनी राजकारणात प्रंचड अस्वस्थता आणि गोंधळ होऊन राजकिय उलथापालथ होईल असे म्हटले आहे. तसेच भगव्याच राज्य येऊन बळीराजाला सुखाचे दिवस येतील, महागाई शिगेला पोहचेल, समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल होईल, जगात भारत देश महासत्ता बनेल असे भाकित केले.
या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेशातील असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेदरम्यान सकाळपासूनच विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली असून परपरेनुसार कर्नाटकातील विजापुरहुन आदिलबादशहाचे बाशिंग श्रींचरणी अर्पण करण्यात आले आहे. यावेळी हेडाम नृत्य करत फरांडेबाबा खेलोबा वाघमोडे यांनी ही भाकणुक केली आहे. यावेळी जवळपास 70 टन भंडारा,
खारीक, खोबऱ्याची उधळण या यात्रेत करण्यात आली आहे.