ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु झाला आहे. पण ऊस दराच्या तोडग्याअभावी अपवाद वगळता सर्व कारखाने बंदच आहेत. साखरेसह अन्य उपपदार्थांना गेल्या वर्षभरात चांगला भाव मिळाल्यामुळे गत वर्षात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 400 रूपयेंचा हप्ता आणि चालू गाळप हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन किमान 3500 रूपये विनाकपात पहिला हप्ता देण्याची सर्वच शेतकरी संघटनांची मागणी आहे.
पण कारखानदारांना ही मागणी मान्य नसल्यामुळे संघटना आणि कारखानदारांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ऊस दराबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींची गुरुवारी (2 रोजी) दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी बैठक आयोजित केली आहे.