मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक करण्यात आली आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर लगेच त्यांना संगमेश्वर मधील गोळवली येथून रत्नागिरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे तणावाची स्थिती आहे.
दरम्यान, राणेंच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अटक करायला आलेले पोलिस अटक वॉरंट दाखवत नाहीत. अटक वॉरंट दाखवा असा सवाल आम्ही पोलिसांकडे केला. पण पोलिस आमच्यावर दबाव असल्याचे सांगत आहेत, असे जठार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जोपर्यंत राणेंची सुटका होत नाही तोपर्यंत भाजपचे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा जठार यांनी दिला आहे.
नारायण राणे यांना अटक, संगमेश्वर येथून घेतलं ताब्यात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -