Tuesday, April 23, 2024
Homenewsदोन वर्षाच्या बालकासह महिलेचा खून..

दोन वर्षाच्या बालकासह महिलेचा खून..


कराड जवळ वारुंजी गावच्या हद्दीत दोन वर्षाच्या मुलासह महिलेचा खून झाला. खून झालेल्या दोघांचेही मृतदेह सडलेल्या अवस्थेत मंगळवारी (दि. २४) सकाळी आढळून आले. उग्र वास येऊ लागल्याने परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
सुशीला सुनील शिंदे (वय 35) व विराज निवास गायकवाड (वय 2) असे खून झालेल्यांची नावे आहेत. तर संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, कराड जवळ विमानतळ परिसरात सुशीला शिंदे या आई बरोबर राहतात. त्यांच्याजवळ सुशिलाच्या बहिणीचा मुलगा विराज राहत असतो.


दरम्यान, शनिवारी सकाळी सुशीला या आपल्या बहिणीचा मुलगा विराज याला घेऊन सकाळी विमानतळ येथील घरातून बाहेर पडल्या. त्या पुन्हा घरी आल्या नाहीत. म्हणून नातेवाईकांनी काल शहर पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली.
त्यानंतर सोमवारी रात्री घटना घडलेल्या ठिकाणी वारुंजी येथील सत्यजित पतसंस्थेच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीतून उग्र वास येऊ लागला. त्यामुळे मंगळवारी सकाळी परिसरातील नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.


पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन संबंधित खोलीत जाऊन माहिती घेतली असता खोलीमध्ये सडलेल्या अवस्थेत खून झालेल्या एका बालकासह महिलेचा मृतदेह आढळून आला.


महिलेसह बालकाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी त्वरित हालचाली करून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना केली.
घटनास्थळी डीवायएसपी डॉ. रणजीत पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर(Amit babar) यांनी भेट देऊन पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -