इचलकरंजी; पंचगंगा घाटावरील सूर्यनारायण मंदिरात सुर्यदेवाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीघाट परिसरात उभारण्यात आलेल्या सुर्यनारायण मंदिरात श्री सुर्यदेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी करण्यात आली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे आणि सौ. किशोरी आवाडे यांच्या हस्ते होमहवन आणि धार्मिक विधी करण्यात आले. तर माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले.
इचलकरंजीतही उत्तर भारतीयांची संख्या मोठी असून दरवर्षी पंचगंगा नदी घाटावर मोठ्या प्रमाणात छठ पुजा केली जाते. त्यासाठी येथील पंचगंगा नदीघाट परिसरात सुर्यदेवाचे मंदिर उभारण्याची मागणी होती. ती मागणी पूर्ण झाली असून पंचगंगा नदीघाट परिसरात सुर्यनारायण मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या सूर्यनारायण मंदिरात श्री सुर्यदेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानिमित्ताने छठ पुजा युवा शक्ती समितीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रकाश आवाडे आणि सी. किशोरी आवाडे यांच्या हस्ते होमहवन विधी करण्यात आले. यावेळी महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. यावेळी स्वप्निल आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारीक, राजवर्धन नाईक-निंबाळकर, अरविंद शर्मा, पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, रमेश आरबोळे (जगवाले), विलास गाताडे छठ पूजा युवा शक्ती समितीचे अध्यक्ष शिवजी गिरी, उपाध्यक्ष नंदकिशोर प्रसाद, सचिव खलीफा महतो यांच्यासह गोखले गुरुजी, पेटकर गुरुजी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.