इचलकरंजी ; पुर्ववैमनस्यातून दोन मित्रांमध्ये मारामार
पुर्ववैमनस्यातून दोन मित्रांमध्ये वादावादी झाली. या वादावादीत हातमागाच्या माऱ्याने मारहाण झाल्याने सतिश शामराव पसारे( वय ३६ रा. शहापूर) हा जखमी झाला. याप्रकरणी संतोष इंगळे यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबतची फिर्याद सतिश पसारे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सतिश पसारे व संतोष इंगळे हे दोघे एकमेकांचे लहानापासूनचे मित्र आहेत. गेल्या १५ दिवसांपूर्वी दोघांमध्ये गैरसमजूतीतून किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून इंगळे हा पसारे यांच्या अचानक घरी आला. यावेळी त्याने पसारे यांना वाईट शिवीगाळ करत
हातमागाच्या माऱ्याने डोक्यात मारहाण केली. त्यानंतर वाद
सोडवण्यासाठी आलेल्या पसारे यांची आई व बायकोला धक्काबुकी करत तिथून पसार झाला.