दिवाळीतला ठरलेला पदार्थ म्हणजे शंकरपाळी. खुसखुशीत मैद्याच्या गोड शंकरपाळी सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. आज आम्ही तुम्हाला शंकरपाळ्याची रेसिपी सांगणार आहोत.
साहित्य :
1 किलो मैदा
1/5 किलो साखर
1/2 किलो तूप
1/2 लिटर दूध
कृती :
सर्वप्रथम कढईत तूप गरम करा.
त्यात दूध ओता आणि साखर घालून विरघळून घ्या.
त्यात मैदा घालून छान पिठ मळून घ्या. पिठाची हलक्या हाताने मोठी पोळी लाटून घ्या.
सुरी किंवा चरकीने शंकरपाळी तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या.
शंकरपाळी तेलात मंद आचेवर तांबूस रंगावर तळा.
खुसखुशीत शंकरपाळ्या तयार.