Monday, April 22, 2024
Homeनोकरीरेल्वेत 16 हजार पदांसाठी बंपर भरती, 10वी, 12वी पास उमेदवारांनी आत्ताच करा...

रेल्वेत 16 हजार पदांसाठी बंपर भरती, 10वी, 12वी पास उमेदवारांनी आत्ताच करा अर्ज

taji batmi online team नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (Indian Railways Jobs) विविध झोनमध्ये अप्रेंटिस पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. शिकाऊ उमेदवारांसाठी एकूण 16000 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर आहे. रेल्वेकडून वेगवेगळ्या झोनच्या आधारे ही भरती केली जाणार आहे. सर्व झोन मिळून एकूण 16,510 पदांची भरती करण्यात येणार आहे. 

दक्षिण रेल्वे भरती
दक्षिण मध्य रेल्वेकडून शिकाऊ उमेदवाराच्या 4103 पदांसाठी अर्ज (Railway Apprentice Recruitment 2021) मागविण्यात आले आहेत. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर आहे. इच्छुक उमेदवारांनी scr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन शक्य तितक्या लवकर अर्ज करावा.

पूर्व रेल्वेने मागवले अर्ज
रेल्वे रिक्रूटमेंट सेलने पूर्व रेल्वेमध्ये 3366 शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर 2021 आहे. इच्छुक उमेदवार www.rrcer.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ पदासाठी भरती
पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (RRC Apprentice Recruitment 2021) शिकाऊ उमेदवारांच्या एकूण 2226 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 नोव्हेंबर 2021 आहे. उमेदवार wcr.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -