Wednesday, December 4, 2024
Homeराजकीय घडामोडीत्यांनी कमळाबाईच्या दारात बसून…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “काल जे...

त्यांनी कमळाबाईच्या दारात बसून…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “काल जे झालं…!”

 

 

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याचा प्रकार घडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक दिवस आधीच स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर दोन्ही गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी आधी घोषणाबाजी व नंतर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या सर्व प्रकारावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारकस्थळी गोंधळ घालणाऱ्यांना शिवसैनिक म्हणता येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

“मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव”

“काल स्मृतीस्थळावर येऊन ज्या बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, नौटंकी केली, त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला तिलांजली दिली, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला ते शिवसैनिक कसे? बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. पण काल ज्यांनी तिथे नौटंकी केली, त्यांना आम्ही कधीच शिवसैनिक मानणार नाही. संत तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे”, असं संजय राऊत म्हणाले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.“ही २०२४ची तयारी आहे”

“जो खरा निष्ठावंत आहे, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहे त्यानं विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे. काल जो प्रकार घडला त्यात निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना प्रतिकार केला. कालचा तो ट्रेलर आहे. २०२४ ची ही तयार आहे. काल तिथे आलेल्यांनी आधीच १० वेळा पक्ष सोडलाय. ते आम्हाला काय निष्ठा शिकवतायत? कुणी काँग्रेसमध्ये गेले, कुणी राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेना शिंदे गटात गेले”, असंही राऊतांनी नमूद केलं.त्यांच्यात श्रद्धा असती तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईच्या दारात गुलामी केली नसती. काल झालं तो ट्रेलर आहे. पुढे बघा काय होतंय”, असा इशाराही राऊतांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -