Tuesday, November 28, 2023
Homeब्रेकिंगराज्यात आणखी 20 हजार शिक्षकांची भरती करणार; शिक्षण खात्याचा मोठा निर्णय, डीएड-बीएडधारकांना...

राज्यात आणखी 20 हजार शिक्षकांची भरती करणार; शिक्षण खात्याचा मोठा निर्णय, डीएड-बीएडधारकांना संधी

 

 

शिक्षण खात्याने (Education Department) आणखी २० हजार शिक्षकांची भरती (Teacher Recruitment) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच शिक्षक भरतीसाठी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे डीएड आणि बीएड्धारकांना (D.Ed and B.Ed) रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.काही दिवसांपासून राज्यात १३५०० शिक्षकांच्या जागा भरती करण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत अनेक शिक्षकांना नियुक्तीपत्र दिले आहे. त्यानुसार विविध शाळांमध्ये शिक्षक दाखल होत आहेत, तरीही सरकारी शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने पुन्हा शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या डीएड आणि बीएड महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे कल वाढेल, असे मत व्यक्त होत आहे. दरवर्षी शिक्षक भरती होत नसल्याने प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली तरीही शहरातील पाच अनुदानित डीएड महाविद्यालयांत सरकारी कोट्यातील जागा भरती होण्यास अडचण होत आहे, मात्र दरवर्षी शिक्षक भरती झाली तर डीएड महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.शिक्षक भरतीस होत असलेला विलंब, तसेच विद्यार्थ्यांची दरवर्षी कमी होणारी संख्या आणि सरकारच्या विविध नियमांमुळे बेळगाव जिल्ह्यातील ९० टक्‍के विनाअनुदानित डीएड महाविद्यालये बंद झाली आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगाव जिल्ह्यात एकूण ८४ डीएड महाविद्यालये होती व विद्यार्थी अधिक प्रमाणात होते. मात्र, अनेक वर्षांपासून सरकारने शिक्षक भरतीस प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे डीएड झालेले लाखो विद्यार्थी बेरोजगार झाले आहेत. याचा परिणाम डीएड महाविद्यालयांवर झाला आहे, मात्र १३५०० शिक्षकांच्या भरतीनंतर पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती केली असल्याने डीएड व बीएड महाविद्यालयांत विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.७१ डीएड महाविद्यालये बंद शिक्षण खात्याच्या माहितीनुसार २०१२-१३ च्या शैक्षणिक वर्षांपासून चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील ४० तर बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३१ डीएड महाविद्यालये बंद झाली आहेत. काही वर्षांत डीएड महाविद्यालयांतील सरकारी कोट्यातील जागाही भरल्या जात नाहीत. सध्या जिल्ह्यातील फक्‍त अनुदानित डीएड महाविद्यालये सुरू आहेत. यापैकी शहरात पाच डीएड महाविद्यालये असून, यापैकी अनेक डीएड महाविद्यालयांना इतिहास असून, काही वर्षांपूर्वी डीएड महाविद्यालयांसमोर प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागत होत्या.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र