Tuesday, May 21, 2024
Homeसांगलीबंगला फाेडला; दागिन्यांसह दहा लाखांच्‍या ऐवजावर डल्‍ला

बंगला फाेडला; दागिन्यांसह दहा लाखांच्‍या ऐवजावर डल्‍ला

या बाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रीकांत पाटील हे मुळचे वडगाव (ता, तासगाव ) येथील रहिवाशी आहेत. व्यवसायानिमित्त ते पुणे येथे वास्तव्यास असतात. त्यांचा तासगाव -वासुबे रस्त्यावर वासुबे हद्दीत बंगला आहे. श्रीकांत पाटील हे दिवाळी निमित्त गावी आले होते. ते दोन दिवस त्याच्या व भाऊ शशिकांत याच्या कुटूंबासह बंगल्यात राहीले होते.

दोन दिवसात ते पुण्याला कुटूंबासह जाणार होते. तत्पूर्वी गावी वडगावला जाऊन येऊ या, म्हणून कुटूंबातील सर्वजण दि, ५ नोव्हेंबर रोजी गावी गेले होते. त्याच रात्री चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधून बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कडी कोयडा उचकटून बंगल्यात प्रवेश केला.येथिल श्रीकांत काशीनाथ पाटील (वय ३८) याचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोने-चांदीच्या दागिन्यांसह १० लाख २३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना शुक्रवार दि, ५ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. याबाबत श्रीकांत पाटील यांनी तासगाव पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -