Tuesday, November 28, 2023
Homeसांगलीसांगली : अपघातात तरुणाचे शिर धडावेगळे

सांगली : अपघातात तरुणाचे शिर धडावेगळे

 

 

चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव वेगात असणारी कार डिव्हायडरला धडकल्याने देशिंग येथील हेमाकांत मधुकर काकडे (वय 28) हा तरुण जागीच ठार झाला. अपघात इतका भीषण होता की, तरुणाचे शिर धडावेगळे झाले.ही घटना

गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.

 

याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, देशिंग येथील हेमाकांत काकडे हा कारने (एमएच 09 बीडब्ल्यू 2700) जात होता. बोरगाव टोल नाक्यावर त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव कार डिव्हायडरला जोरात धडकली. कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पंढरपूर रोडवर गेली. यावेळी कोल्हापूरहून तुळजापूरला चाललेल्या कारला (एमएच 09 एयू 9070) या कारने जोरदार धडक दिली.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र