Wednesday, July 30, 2025
Homeब्रेकिंगराज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर; काय आहेत अटी?

राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर; काय आहेत अटी?

 

यंदाच्या वर्षी विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिल्याचं पाहायला मिळालं. एसटी कर्मचारी, बीएसची कर्मचारी या आणि अशा बऱ्याच कर्मचाऱ्यांनी संपाची हाक देत प्रशासनाचा खडबडून जागं केलं होतं. आता 2023 या वर्षाचा शेवटही यातच संपानं होणार आहे. कारण, एकदोन नव्हे, तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत. 14 डिसेंबरपासून हा संप सुरु होणार असून, या बेमुदत संपाच्या माध्यमातून ते बऱ्याच मागण्या उचलून धरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

जुन्या पेन्शनसह इतर 17 मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 14 डिसेंबरपासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याचा दावा समन्वय समितीच्या वतीनं करण्यात आला असून, मार्च महिन्यात झालेल्या सात दिवसांच्या संपानंतर, आश्वासनं देऊनही त्यांची पूर्तता न झाल्यामुळं कर्मचारी संघटनेनं संपाची हाक दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -