अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाबद्दल अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगत असतात. आता देखील शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. आर्यन खान याने एका मुलीला लाथ मारली होती… तेव्हा नक्की काय घडलं होतं, याचा खुलासा शाहरुख खान याने ‘कॉफी विथ करण’ केला होता. आर्यन याने रागात एक मुलीला मारहाण केली होती.. यामागे कारण होतं शाहरुख खान… शाहरुख खान याने सांगितलं, ‘ती मुलगी आर्यन याला म्हणाली होती, ‘तुझे वडील कोन बनेगा करोडपती’मध्ये कुरुप दिसत होते…’ तेव्हा आर्यन फक्त नऊ वर्षांचा होतां.
‘मुलीने माझ्याबद्दल असं वक्तव्य केल्यांमुळे आर्यन याला राग आला. याच गोष्टीचा आर्यन याला राग आला आणि त्याने मुलीला लाथ मारली..’ यावर आर्यन म्हणाला, ‘पापा सगळी चूक फक्त तुमची आहे. तुम्ही कूल आणि हँडसम आहात, पण जाड आहात…’ लेकाचं वक्तव्य ऐकून शाहरुख खान याला देखील धक्का बसला.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर्यन खान आणि शाहरुख खान यांची चर्चा रंगली आहे.
शाहरुख – आर्यन यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघांमध्ये बाप – लेक नाही तर, मित्राचं नातं आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शाहरुख कायम लेक आर्यन याच्याबद्दल बोलताना दिसतो. गौरी खान देखील आर्यन याच्याबद्दल अनेक गोष्टी मुलाखतींच्या माध्यमातून सांगत असते.
आर्यन खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर किंग खान याचा लेक मार्शल आर्टमध्ये माहिर आहे. आर्यन खान याने बॉलिवूडमध्ये अद्याप पदार्पण केलेलं नाही. पण आर्यन सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर आर्यन याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण आर्यन फार कमी सेलिब्रिटींना फॉलो करतो.
शाहरुख खान आणि गौरी खान यांनी तीन मुलं आहेत. आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान असं त्यांच्या मुलांची नावे आहेत. आर्यन खान लेखन क्षेत्रात स्वतःचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सुहाना लवकरच ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सुहाना हिच्यासोबत अन्य सेलिब्रिटी किड्स देखील आहेत.
शाहरुख खान याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘डंकी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. यंदाच्या वर्षी किंग खान याने बॉलिवूडला दोन हीट सिनेमे दिले. ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमाने भारतातच नाही तर, जगभरात नवीन विक्रम रचले. आता चाहते किंग खान याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.