मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांचे जे निकाल आणि कल समोर येत आहेत ते पाहून मी खूप खुश आहे असं मिसेस डीसीएम अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच हे यश आम्हाला अपेक्षित होतं. त्याप्रमाणेच ते मिळताना दिसतं आहे भाजपाच यापुढे नंबर वन असणार आहे असंही त्या म्हणाल्या.
अमृता फडणवीस यांची X पोस्टही चर्चेत
अमृता फडणवीस यांनी जे निकाल लागत आहेत त्यानंतर दोन ओळींची एक पोस्ट केली आहे. प्रगति का रंग आज साफ नज़र आता है ,जहां भी देखू बस भगवा ही लहराता है … ! #ElectionResults असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांची ही पोस्टही चर्चेत आहे.आता सगळीकडे भाजपाच नंबर वन
मुंबईत पत्रकारांशी चर्चा करताना अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा यापुढे सगळीकडे नंबर वन असणार आहे असं त्या म्हणाल्या. त्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला की मध्यप्रदेशात भाजपाचं सरकार आल्यानंतर शिवराज सिंह चौहान हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का? यावरही त्यांनी उत्तर दिलं.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
“महाराष्ट्रात मी इतकंच सांगू शकते की देवेंद्र फडणवीस भाजपाच्या मागे आहेत. भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या मागे आहे. भाजपा आणि देवेंद्र फडणवीस मिळून भाजपाची सत्ता आणतील इतकंच मी सांगू शकते.”
मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान या चारही राज्यांचे निकाल समोर येत आहेत. याबाबत विविध प्रतिक्रियाही समोर येत आहेत. चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. या तेलंगणाचा अपवाद वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भाजपा सत्ता स्थापन करणार हे उघड आहे. मध्य प्रदेश भाजपाच्या हातून जाईल असं बोललं जात होतं तिथे भाजपाला रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. याच अनुषंगाने अमृता फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.