Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगतमिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये ‘मिचौंग’ चक्रीवादळाचा कहर; चेन्नईमध्ये 5 जणांचा मृत्यू

तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये ‘मिचौंग’ चक्रीवादळाचा कहर; चेन्नईमध्ये 5 जणांचा मृत्यू

 

‘मिचौंग’ चक्रीवादळाने दक्षिण भारतात हाहा:कार माजवला आहे. तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये तर कहर पाहायला मिळतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याशी फोनवरून बातचित केली. केंद्र सरकार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास त्यांनी स्टॅलिन यांना दिला.’मिचौंग’ चक्रीवादळामुळे चेन्नईमध्ये तुफान पाऊस बरसतोय. चेन्नईमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आज हे चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या सागरी किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. नेल्लोर आणि मछलीपट्ट्नम या बीचवर हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.रेकॉर्ड ब्रेक पाऊस

‘मिचौंग’ चक्रीवादळाने दक्षिण भारतात हाहा: कार माजवला आहे. तुफान पाऊस कोसळतोय. चेन्नईमध्ये मागच्या 80 वर्षांचा रेकॉर्ड कालच्या पावसाने मोडला आहे. आजही तमिळनाडूच्या दहा जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई, तिरुवल्लुर, चेंगलपट्टू, कांचीपुरम, रानीपेट आणि वेल्लोर या जिल्ह्यांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर याआधी काल झालेल्या पावसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

 

ठिकठिकाणी पाणीच पाणी

‘मिचौंग’ चक्रीवादळामुळे तमिळनाडूमध्ये ठिकठिकाणी पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळतं आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळतंय. अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरलं आहे. त्यामुळे स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. तसंच या पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे.विमानतळात पाणी, फ्लाईट कॅन्सल

‘मिचौंग’ चक्रीवादळाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. विमानतळामध्ये पाणी शिरलं आहे. तसंच हवामान खराब असल्यामुळे 12 फ्लाईट कॅन्सल करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मात्र गैरसोय होणार आहे.

 

‘मिचौंग’ आज आंध्रप्रदेशमध्ये

‘मिचौंग’ हे चक्रीवादळ आज आंध्रप्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्यासाठी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. तिरुपती, नेल्लोर, प्रकाशम, बापटला, कृष्णा, पश्चिम गोदावरी, कोनसीमा आणि काकीनाडा या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहत काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -