गेल्या सहा महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या चोऱ्या, घरफोडीच्या गुन्हयांचा समांतर तपास करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडे दिली आहे. त्यानुसार पथकाने (investigation) तपास करून मोबाईल शॉपीसह दोन घरफोडीचे गुन्हे उघडक करून त्यातील १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चंदगडमध्ये जुलै महिन्यात मोबाईल शॉपी फोडलेल्या चोरट्यांचा तपास करताना एलसीबीच्या पथकाने तिघा चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले. यातील टॅब, ब्ल्युटूथ, पेनड्राईव्ह, बल्ब, टीव्ही, गॅस शेगडी, मॉनिटर, दोन कॅमेरे असा १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी (investigation) हस्तगत केला.
या प्रकरणी संशयीत अनुरोध लक्ष्मण बिरंजे (वय २३), कुमार किरण कंगराळकर (वय १९, दोघे रा. शिनोळी खुर्द, ता. चंदगड) व भरमू बाबू तरवाळ (वय ३१, रा. शिनोळी, ता.चंदगड) यांना अटक केली आहे. एलसीबीचे अंमलदार राजू कांबळे यांना खबऱ्याकडून चंदगड येथील चोरीतील संशयित नेसरी बस स्टॉपजवळ दुचाकीने येणार आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि सागर वाघ, अंमलदार प्रकाश पाटील, कृष्णात पिंगळे, तुकाराम राजीगरे, समीर कांबळे यांच्या पथकाने सापळा रचून सोमवारी दुपारी दोघांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी तीन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली.