Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशवर्ल्ड कप फायनल सामना पुन्हा होणार? ऑस्ट्रेलियाच्या चिटींगमुळे Icc चा निर्णय?

वर्ल्ड कप फायनल सामना पुन्हा होणार? ऑस्ट्रेलियाच्या चिटींगमुळे Icc चा निर्णय?

वर्ल्ड कप फायनल सामना पुन्हा होणार? ऑस्ट्रेलियाच्या चिटींगमुळे Icc चा निर्णय?

टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून  फायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला. ट्रेव्हिस हेड याने केलेल्या शतकामुळे टीम इंडियाचं 12 वर्षांनी पुन्हा विश्वविजेता होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं. याच कांगारुंनी 20 वर्षात टीम इंडियाला दुसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत केलं.सलग 10 सामने जिंकून फायनलमध्ये पोहचलेली टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरली. टीम इंडियाच्या पराभवामुळे क्रिकेट चाहते ही नाराज झाले. तसेच टीम इंडियाचे खेळाडू या पराभवातून अजूनबी सावरेलेले नाही. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अन्य खेळाडूंना पराभवानंतर अश्रू अनावर झाले. असं झालं असतं तर टीम इंडिया जिंकली असती, या अशा जर तरच्या चर्चा अजूनही क्रिकेट चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.

टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा वर्ल्ड कप फायनल सामना होताना पाहायचा आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा कॅच ट्रेव्हिस हेड याने उलट धावत पकडला होता. ट्रेव्हिसने हा कॅच सोडला होता असा दावा केला जात आहे. हेडने कॅच पकडताना बेईमानी केल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे टीम इंडियासोबत अन्याय झाल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाही, तर काही सोशल मीडिया पोस्टद्वारे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया यांच्यात पुन्हा एकदा वर्ल्ड कप फायनल होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आयसीसीनेच हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. हेडने घेतलेल्या कॅचचा निर्णय वादग्रस्त ठरल्याने आयसीसी अंतिम सामना पुन्हा आयोजित करत असल्याचं म्हटलं जातंय. हा दावा किती खरा आहे, हे आपण जाणून घेऊयात.

नक्की खरं काय?

वर्ल्ड कप फायनल सामना पुन्हा होणार नाही. आयसीसीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सोशल मीडियावर काही जणांनी खोडसाळपणा करुन वर्ल्ड कप फायनल पुन्हा होणार असल्याचं म्हणत आहेत. मात्र तसं काही नाही. टीम इंडियाच्या काही अतिउत्साही चाहत्यांनी काही पोस्ट व्हायरल केल्या आहेत, ज्यात दावा केला जात आहे की ट्रेव्हिस हेड याने रोहितचा कॅच निट पकडला नाही. मात्र त्याने कॅच घेतल्याचं भासवत सर्वांचीच फसवणूक केली. मात्र तसं काही नाही.

ट्रेव्हिस हेड याने घेतलेल्या कॅचचा व्हीडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हीडिओत पाहू शकता की ट्रेव्हिस हेड याने अचूकपणे रोहित शर्मा याचा कॅच पकडला आहे. त्यामुळे पुन्हा वर्ल्ड कप फायनल होणार ही सोशल मीडियावर सुरु असलेली चर्चा पूर्णपणे फेक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -