Saturday, July 27, 2024
Homeआरोग्यविषयकअत्यावश्यक औषधांच्या किंमतीत 40 टक्क्यांची वाढ,

अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत 40 टक्क्यांची वाढ,

देशातील इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक सगळ्याच वस्तू महाग होत आहेत आणि त्यात औषधे देखील अपवाद नाहीत. 15 ते 20 टक्क्यांनी ह्रदयरोग आणि मधुमेहावरील औषधांच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर प्रतिजैविक औषधे तसेच टॉनिक आणि खोकल्याच्या औषधांच्या किंमतीतही मोठी वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना त्याचा फटका बसत आहे.

औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक पुरवठा साखळीत कोरोना व्हायरसमुळे अडथळा आला आहे. त्यामुळे भारतात पॅरासिटामॉलसह पेनकिलर, अँटीइन्फेक्टीव्ह, कार्डियाक आणि अँटीबायोटिक्ससह अत्यावश्यक औषधांच्या किमतीत 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. औषधी क्षेत्रात ज्याला सक्रिय फार्मास्युटिकल घटक किंवा API म्हणतात. त्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे औषधे महागली आहेत. एवढ्यात ही औषधांची महागाई आटोक्यात येण्याची चिन्ह नाहीत. दरम्यान रुग्णांचे नातेवाईक सध्या अर्धीच औषधे विकत घेत आहेत.

औषध निर्मितीसाठी अत्यावश्यक असलेल्या कच्चा मालाच्या पुरवठा साखळी कोरोनामुळे अडचणीत आली. अत्यावश्यक औषधांच्या कच्च्या मालाच्या किंमतीत सरासरी 50 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर 140 टक्क्यांपर्यंत पर्यंत काही घटकांची वाढ गेली आहे. गेल्या वीस वर्षात औषधांच्या किंमतीत एवढी भरमसाठ वाढ कधी झाली नसल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -