Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमोठी बातमी! शिवसेनेच्या ‘त्या’ आमदारांचा निक्काल लावण्यासाठी ओव्हरटाईम?; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय...

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘त्या’ आमदारांचा निक्काल लावण्यासाठी ओव्हरटाईम?; विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय काय?

 

 

आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशाला सुरुवात होण्याआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयावरही राहुल नार्वेकर यांनी भाष्य केलं आहे. तसंच अधिवेशन काळात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, यावरही नार्वेकरांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला देण्यात आलेल्या कार्यालयाच्या जागेवरही राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय.या हिवाळी अधिवेशना दरम्यान अपात्र याचिकेवर सुनावणी घेणार आहे. जास्तीत जास्त वेळ घेऊन मी सुनावणी घेणार आहे. अधिवेशन आणि ही सुनावणी असं सगळं मॅनेज करणे हे एक आव्हान आहे. पण अधिवेशनासाठी पूर्ण वेळ देऊन महत्वपूर्ण बाबी असतील, त्यावर मी लक्ष देईन. प्रत्येक दिवसाचं विधिमंडळाचं कामकाज बघून आम्ही सुनावणी घेऊ. माझं काम ते सकाळी 9 ते रात्री 9 असे 12 तासांचं तरी असेल, असं राहुल नार्वेकर म्हणालेत.राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय. हे अधिवेशन राज्याच्या गोर गरीब जनतेसाठी अत्यंत उपयोगी ठरेल. सर्व प्रश्नावर चर्चा होईल, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -