Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमुंबई-पुण्यासह 40 शहरांवर ड्रोन हल्ल्याचा कट, ISISच्या दहशतवादी प्लॅनचा पर्दाफाश!

मुंबई-पुण्यासह 40 शहरांवर ड्रोन हल्ल्याचा कट, ISISच्या दहशतवादी प्लॅनचा पर्दाफाश!

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

मुंबई… देशाची आर्थिक राजधानी, मात्र याच मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याचा मोठा कट उघडकीस आलाय. केवळ मुंबईच नाही, तर देशातील 40 प्रमुख शहरांवर ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र आयसीसनं आखलं होतं. मात्र एनआयएनं हा खतरनाक कट उधळून लावलाय. ठाणे भिवंडी पडघा, भाईंदर, पुणे आणि कर्नाटकमध्ये एकाचवेळी तब्बल 44 ठिकाणी NIAनं छापेमारी केली.

 

या छापेमारीदरम्यान ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली भागातून 15 संशयितांना अटक करण्यात आलीय. पडघ्यात राहणारा साकीब नाचन हा या कटाचा मुख्य सूत्रधार आहे. त्यालाही अटक करण्यात आलीय. त्यांच्याकडून 1 पिस्तूल, 2 एअर गन, 8 तलवारी, 2 लॅपटॉप, 6 हार्ड डिस्क, 38 मोबाईल फोन, 10 पुस्तकं जप्त करण्यात आली. त्याशिवाय रोख रक्कम आणि हमास या दहशतवादी संघटनेचे 51 झेंडे जप्त करण्यात आले. हे सर्वजण मुंबईवर ड्रोन हल्ला करण्याच्या तयारीत होते, अशी धक्कादायक बाब तपासात उघड झाली. या सगळ्या दहशतवाद्यांना ड्रोन उडवण्याची ट्रेनिंग देण्यात आली होती.

 

याप्रकरणी मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागातही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. तिथल्या काही लोकांची कसून चौकशी करण्यात आली. हे संशयित दहशतवाद्यांना विदेशातून फंडिंगही मिळत होती, अशी सूत्रांची माहिती आहे. एनआयए त्याबाबत अधिक कसून तपास करतेय. पुण्यातून ज्या संशयितांना एनआयएनं अटक केली, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक दस्तावेज सापडले. त्यांच्याकडे झाकिर नाईकच्या भाषणांचे व्हिडिओ सापडले. या व्हिडिओंच्या माध्यमातून इसिस भरती केली जात असावी, असा संशयआहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -