Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगसंजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावली, ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

संजय राऊत यांच्यावर चप्पल भिरकावली, ‘नारायण राणे जिंदाबाद’च्या घोषणा; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर काल चप्पल भिरकावण्यात आली होती. इंदापूर येथे झालेल्या या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली होती. या घटनेचे आज पडसादही उमटले. धनगर समाजाने रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेधही नोंदवला. ही घटना ताजी असतानाच आज ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या दिशेनेही चप्पल भिरकावण्यात आली. यावेळी चप्पल फेकणाऱ्याने नारायण राणे जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. शेकडो शिवसैनिकांची उपस्थिती आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त असूनही संजय राऊत यांच्यावर चप्पल फेकण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

संजय राऊत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज दिवसभर त्यांनी सोलापुरात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. शिवसैनिकांशी संवाद साधला. मीडियाशीही संवाद साधला. संध्याकाळी त्यांचा मुख्य आणि महत्त्वाचा कार्यक्रम होता. राऊत यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन करण्यात येणार होतं. त्यामुळे राऊत थांबले होते. संध्याकाळी ते कार्यक्रम स्थळी आले. राऊत यांच्या हस्ते हॉटेलचं उद्घाटनही करण्यात आलं. त्यानंतर राऊत यांनी या ठिकाणी तडाखेबंद भाषणही दिलं. अन् चप्पल भिरकावून पळाला या कार्यक्रमाला शिवसैनिकांची प्रचंड गर्दी होती. पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यक्रम आटोपून संजय राऊत निघाले होते.

राऊत बाहेर पडले. गाडीत बसले. त्यांची गाडी काही अंतरावर गेली. गर्दी असल्याने गाडीचा स्पीड कमी होता. इतक्यात गाडीच्या टपावर काही तरी वाजल्याचा आवाज झाला अन् सर्वच अलर्ट झाले. गाडीच्या टपावर एक पिशवी पडली होती. या पिशवीत पाच ते सहा चपलांचे जोड होते. राऊत यांच्या दिशेने या चपला भिरकावण्यात आल्या होत्या. चप्पल भिरकावल्यानंतर नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा देत एक तरुण गर्दीतून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. संजय राऊत हे सुखरुप आहेत. त्यांना काहीही झालं नसल्याचं सांगण्यात आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -