Sunday, July 27, 2025
Homeइचलकरंजी'त्या' डॉक्टरची आत्महत्या की घातपात ? : हातकणंगले तालुक्यातील घटना

‘त्या’ डॉक्टरची आत्महत्या की घातपात ? : हातकणंगले तालुक्यातील घटना

ताजी बातमी /online team
हातकणंगले तालुक्यात एका डॉक्टरने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकताच समोर आली आहे.

दरम्यान हा डॉक्टर कवठेमहांकाळ येथील असल्याचे समजते.संतोष जगन्नाथ ढोले (वय ४१, रा. धुळगाव तालुका कवठेमहंकाळ जिल्हा सांगली) असे या डॉक्टरचे नाव असून या डॉक्टरने मौजे वडगाव तालुका हातकणंगले येथे गायरान जागेतील झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची फिर्याद मौजे वडगावचे पोलीस पाटील अमिर हजारी यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे.

संतोष ढोले हे डॉक्टर व्यवसायिक असून त्यांचा इस्लामपूर तालुका वाळवा येथे धन्वंतरी हेल्थ केअर सेंटर या नावाने दवाखाना आहे. पण त्यांनी मौजे वडगाव येथे येऊन आत्महत्या करण्याचे कारण काय? किंवा त्यांचा कोणीतरी घातपात केला असावा? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेची नोंद शिरोली एम आयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून स. पो. निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेने मात्र उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -