Sunday, December 22, 2024
Homeदेश विदेशIPL 2024 : आयपीएल लिलावात या पाच खेळाडूंवर लागेल सर्वाधिक बोली!...

IPL 2024 : आयपीएल लिलावात या पाच खेळाडूंवर लागेल सर्वाधिक बोली! आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणार

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी मिनी लिलावाची वेळ जवळ आली आहे.19 डिसेंबरला दुबईत लिलाव होणार आहे. या लिलावत सर्वाधिक नजरा या पाच खेळाडूंवर टिकून आहेत. या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायझीमध्ये रस्सीखेच असणार आहे. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत

आयपीएल 2024 एकूण 1166 खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. यात 830 भारतीय खेळाडू आहेत. यात 212 कॅप्ड आणि 909 अनकॅप्ड खेळाडू आहेत. 19 डिसेंबरला हा लिलाव होणार आहे.

आयपीएलमधील 10 फ्रेंचायझीमध्ये 262.95 कोटी रुपये आहेत. हा पैसा 87 खेळाडूंवर खर्च होणार आहे. मागच्या मिनी लिलावात इंग्लंडचा सॅम करन भाव खाऊन गेला होता. त्याच्यासाठी 18.50 कोटी मोजले होते. आता हा विक्रम पाच खेळाडू मोडू शकतात.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत छाप सोडणाऱ्या खेळाडूंचा यात समावेश आहे. यांच्यासाठी कितीही पैसे मोजण्याची फ्रेंचायझीची तयारी आहे. चला जाणून घेऊयात कोण आहेत ते खेळाडू..

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करणाऱ्या ट्रेव्हिस हेड या यादीत आघाडीवर असेल. त्याच्यावर सनरायझर्स हैदराबाद, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांची नजर असणार आहे.

न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याने 578 धावा केल्या होत्या. फलंदाजी आणि गोलंदाजीत कमाल करत असल्याने रचिनसठी रस्सीखेच होईल.

जवळपास 8 वर्षांनंतर एंट्री करणारा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, न्यूझीलंडचा मधल्या फळीतील फलंदाज डॅरेल मिशेल आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्झी यांच्यासाठी फ्रँचायझी मोठी रक्कम मोजतील.

आयपीएलमध्ये एका संघात 18 खेळाडू असणे अनिवार्य आहे. म्हणजेच संघात 18 पेक्षा कमी खेळाडू असू शकत नाहीत. मात्र, जास्तीत जास्त 25 खेळाडू असण्याचं बंधन नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -