Sunday, December 22, 2024
Homeनोकरी5 हजार 374 पदांसाठी मेगा भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ संधी,...

5 हजार 374 पदांसाठी मेगा भरती, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ संधी, लगेचच करा अर्ज

 

 

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. आता अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे थेट न्यायालयामध्ये काम करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे. यामध्ये लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 5 हजार 374 पदांसाठी होत आहे.विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज हा करावा. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आलीये. मुंबई उच्च न्यायालयात 412 रिक्त जागांसाठी देखील ही भरती होत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदांनुसार ठरवण्यात आलीये.

 

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. bombayhighcourt.nic.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल. 18 डिसेंबर 2023 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुकांनी आपले अर्ज हे दाखल करावेत.या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 38 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवारांना विविध टायपिंग चाचणी, स्क्रीनिंग चाचणी, मुलाखत द्यावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हे आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. मग उशीर न करता इच्छुकांनी लगेचच आपले अर्ज भरावेत. ही मोठी संधी आहे.

 

ही एकप्रकारे मेगा भरतीच आहे. 5 हजार 374 पदांसाठी ही भरती पार पडत आहे. थेट अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी. bombayhighcourt.nic.in या साईटवरच तुम्हाला भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही मिळेल. विशेष म्हणजे दहावी पास ते पदवीधर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करताना हे लक्षात ठेवा की, आपण अर्ज हा नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

 

TV9 मराठीचॅनल

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -