Thursday, February 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

कोल्हापूर ; पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

पैसे देण्यासाठी ऑनलाइन पर्याय उपलब्ध नसल्याच्या रागातून पोलीस पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या चौघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. परशुराम उर्फ बबलू बाळू बिरंजे (वय २४, रा. विश्वास शांती चौक, कलानगर, कोल्हापूर), बालाजी गोविंद देऊळकर (वय २३, रा. पवार कॉलनी, पाचगाव), सूरज उपेंद्र शिरोलीकर (वय २२, रा. विचारे माळ, कोल्हापूर) आणि पृथ्वीराज संदीप शिंदे ( वय १९, रा. कदमवाडी रोड, सदर बाजार, कोल्हापूर) अशी अटकेतील हल्लेखोरांची नावे आहेत. अन्य दोन ते तीन जणांचा शोध सुरू आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास टाटा सफारी गाडीतून सहा ते सात जण पोलिसांच्या पेट्रोल पंपावर आले.

त्यांनी २०० रुपयांचे डिझेल घेऊन ऑनलाइन पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र, पेट्रोल पंपावरील कर्मचारी किरण आवळे यांनी ऑनलाइन पैसे देण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे सांगितल्याने गाडीतील युवकांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला. काही युवकांनी खाली उतरून कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. त्यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेले पोलिस कॉन्स्टेबल अल्ताफ कुरेशी यांना धक्काबुक्की करून हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात दगड घातला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -