Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगनवीन वर्षाची सुरुवात पावसाच्या संकटाने, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत या पाऊस

नवीन वर्षाची सुरुवात पावसाच्या संकटाने, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत या पाऊस

 

यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव होता. यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात आणि देशातील काही भागांत झाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. आता पुन्हा वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.सन २०२३ संपण्यासाठी आता काही दिवस राहिले आहे. या वर्षभरात अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अनेक संकटे आली. या वर्षांत पावसावर अल निनोचा प्रभाव होता. यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस महाराष्ट्रात आणि देशातील काही भागांत झाला. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला. आता पुन्हा वर्षअखेर आणि नवीन वर्षांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.काय आहे हवामान विभागाचा अंदाज

३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान तामिळनाडूतील किनारपट्टीवरील भागांत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कमी पातळीच्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग आणि दिल्ली आणि एनसीआरमध्ये पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.स्कायमेटकडून पावसाचा अंदाज

हवामाचा अभ्यास करणारी खासगी संस्था स्कायमेटकडून पावसाचा अंदाज आहे. ३० ते १ जानेवारी दरम्यान होणाऱ्या पावसामुळे सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागताचा आनंदावर पावसाचे विरजन पडणार आहे. पश्चिम वाऱ्यांमुळे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पाऊस पडणार आहे.

 

रब्बी पिकाला बसणार फटका

अवकाळी पाऊस झाल्यास रब्बी पिकाला फटका बसणार आहे. यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे रब्बी पिकाची पेरणी कमी झाली आहे. त्यातच नोव्हेंबर महिन्यात आलेला पावसामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच यंदा थंडीही पडली नाही. त्याचा परिणाम रब्बी पिकावर होणार आहे. या सर्व संकटात अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -