Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रसाताऱ्यातील सार्वजनिक शौचालयात रात्री महिलांना असं काय दिसलं की त्यांची बोबडीच वळली,...

साताऱ्यातील सार्वजनिक शौचालयात रात्री महिलांना असं काय दिसलं की त्यांची बोबडीच वळली, नेमकं काय घडलं?

सातारा शहरातील रविवार पेठेतील महिलांच्या शौचालयात रात्रीच्या सुमारास काही महिलांना चक्क विद्रुप चेहरा असणारी महिला दिसल्यामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

सातारा शहरातल्या एका खोडसाळ प्रकारामुळे महिला वर्गांत भितीचं वातावरण पसरलं आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अनेकांची बोबडी वळली. या भागातील विद्युत पुरवठा काही वेळासाठी बंद असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी या शौचालयात बॅटरीच्या उजेडात येऊन पाहणी केली असता कोणीतरी खोडसाळपणे कपड्याच्या दुकानातील पुतळ्याला चादर गुंडाळून सार्वजनिक शौचालयाच्या आतील ठिकाणी बसवल्याचे निदर्शनास आले.

याविषयी स्थानिक महिलांनी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र हा पुतळा जरी असला तरीदेखील महिला वर्गात भितीचं वातावरण अद्याप असल्याचे पाहायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -