कबनूर येथे घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ६८ हजारांचे सोन्याचे दागिने व साहित्य लांबवले. ही घटना मंगळवारी पहाटे ६.३० च्या सुमारास उघडकीस आली. याबाबतची वर्दी लक्ष्मण मच्छिंद्र घुगे (रा. कबनूर) यांनी दिली.
घुगे हे कुटुंबियांसमवेत लग्नकार्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. पहाटे ते परतले असता चोरीची घटना निदर्शनास आली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतील कपाटातील ८ ग्रॅम वजनाचे ३२ हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, ९ ग्रॅम वजनाची ३५ हजारांची सोन्याची चेन, एक हजारांचा अॅम्प्लीफायर असा सुमारे ६८ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोहेकॉ रजनीकांत कांबळे करीत आहेत.