भारतीय क्रिकेट टीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात चांगली सुरुवात करता आलेली नाही. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना चांगलच सतावलं. केएल राहुलने डाव संभाळला व भारताची लाज वाचवली. मंगळवारी पहिल्या दिवशी टीम इंडियाच्या 8 विकेट गमावून 208 धावा झाल्या आहेत. राहुल 70 धावांवर नाबाद आहे. राहुलशिवाय भारताचे अन्य प्रमुख फलंदाज तंबूत परतले आहेत. राहुलला आता शेपटाकडच्या फलंदाजांना साथीला घेऊन किल्ला लढवावा लागणार आहे. राहुलने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याच सामना केलाच पण सोबत स्लेजिंग झेलून प्रत्युत्तरही दिलं.विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने मोठी इनिग खेळण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये बदलू शकले नाहीत. कोहली 38 धावा करुन आऊट झाला. अय्यर 31 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. पण राहुल शानदार इनिंग खेळला. टीमकडून एकाकी लढत दिली.त्यामुळे तो अस्वस्थ होता
राहुलला दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांच्या स्लेजिंगचा सुद्धा सामना करावा लागला. त्याने खूप आरामात स्लेजिंगला उत्तर दिलं. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसन खूपच आक्रमक होता. त्याला विकेट मिळत नव्हती, त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्याने राहुलला सतावण्याचा प्रयत्न केला. टी ब्रेकआधी जॅनसन ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या एका चेंडूचा राहुलने खूप सुंदर पद्धतीने बचाव केला. त्यावर जॅनसनचा पार चढला. त्याचा चांगलाच तिळपापड झाला. त्याने आक्रमक तेवर दाखवले. राहुलला तो काहीतरी बोलला सुद्धा. पण राहुलने जॅनसनकडे पाहिल व फक्त हसला.राहुल टीम इंडियासाठी लाज वाचवणारी इनिग खेळला. त्याने लोअर ऑर्डरमध्ये बॅटिग करणाऱ्या शार्दुल ठाकूरसोबत 43 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया लवकर ऑलआऊट होण्यापासून वाचली. खराब प्रकाशमानामुळे दिवसाचा खेळ लवकर थांबवावा लागला.