Thursday, March 5, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी: अश्विनकुमार पाटलांच्या घरात चोरी 

इचलकरंजी: अश्विनकुमार पाटलांच्या घरात चोरी 

ताजी बातमी /online team

येथील कोरोचीतील चिंतामणीनगरातील  गल्ली नं. ५ मध्ये  राहणारे अश्विनकुमार पाटील यांच्या घरी नुकताच चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून यामध्ये ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत.

घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कोरोचीतील चिंतामणीनगर येथे घराचा कडी कोयंडा उचकटून ६७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी अश्विनकुमार अशोक पाटील ( वय ३० रा. कोरोची) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोरोचीतील चिंतामणीनगर गल्ली नं. ५ मध्ये अश्विनकुमार पाटील हे कुटुंबासह राहण्यास आहेत. पाटील कुटुंबिय मिरज येथे नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेले होते. घरीच कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी सोमवारी मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला.

घरात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाचे १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स आणि ५५ हजाराची १० ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -