Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगमुंबईत जाताना ‘या’ गोष्टी घेऊन जा, जरांगेंचं आवाहन

मुंबईत जाताना ‘या’ गोष्टी घेऊन जा, जरांगेंचं आवाहन

मुंबईत येताना अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ…’, मनोज जरांगे यांचं महत्त्वाचं आवाहन

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज्यभरातून मुंबईत आंदोलनासाठी दाखल होताना काय-काय घेऊन यावं, याबाबत मनोज जरांगे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. “महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती आपण आहोत तोपर्यंत आपल्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचं आहे. सर्वांना हात जोडून विनंती घरी राहू नका. नियोजनाचे पीडिएफ बनवून संपूर्ण मराठा बांधवांना देणार आहे. हे सर्व नियोजन लिहिण्यात दोन रात्री घालवल्या. हे सर्व नियोजन स्वतः जरांगे पाटील यांनी दोन रात्र जागून केले”, असं जरांगेंनी सांगितलं.

 

“मुंबईपर्यंत मी 100 टक्के जाणार आहे. ही वेळ आहे, आपल्या पोरांना मोठं करायची, आपण आहोत तोपर्यंत आरक्षण मिळवून देऊ. कुणीही गट तट ठेवू नका. एवढ्या वेळेस मराठा म्हणून भाऊ म्हणून लढा, ही संधी पुन्हा येणार नाही. सर्व मतभेद सोडून एकत्र या. पाणी आणि इत्यादी मदत लागेल. त्यामुळे मुंबईच्या समाज बांधवांची आम्हाला मदत लागेल. आमची टीम मैदान पाहायला येणार आहे. त्यांच्यासोबत मदतीला यावे. सर्व जाती धर्मातील बांधवानी आम्हाला साथ द्या. रस्त्यामधील जे गाव आहे त्या गावांनी शक्य असेल तर पाणी इत्यादी सोय करा”, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलं.

 

मुंबईत जाताना ‘या’ गोष्टी घेऊन जा, जरांगेंचं आवाह

“अजून या यात्रेला नाव देणे बाकी आहे. आता अविश्वास बंद झाला. या लेकरावर आता समाजाचा विश्वास आहे. आम्ही आरक्षणाच्या दिशेने लवकर पोहोचू. मुंबईत जाताना अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ घ्या. टॉर्च, मोबाईल चार्जर, कपडे, साबण, दूध पावडर, सरपण, ताव, पातेलं घ्या. ऊसतोड करायला चाललो म्हणून सर्व संसार सोबत घ्या. बेसावध होऊन जायचं नाही, सर्व साहित्य सोबत घ्या”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी

केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -