Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगनव्या वर्षात खिशाला झळ? LPG किंमत, आयकरसह अनेक नियम बदलण्याची शक्यता; बदल...

नव्या वर्षात खिशाला झळ? LPG किंमत, आयकरसह अनेक नियम बदलण्याची शक्यता; बदल जाणून घ्या यादी…

 

 

काही नियम बदलणार आहेत. 2024 या नवीन वर्षात बदलणाऱ्या नियमांमुळे (New Rules) तुमच्या खिशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारी 2024 पासून बँकिंग, सिम कार्ड, विमा यासह अनेक क्षेत्रांमध्ये बदल होणार आहेत. 1 जानेवारीपासून कोणते नवे नियम लागू होणार आहेत, ते जाणून घ्या.

 

नवीन वर्षात कोणते बदल होणार आहेत, हे सविस्तर जाणून घ्या.

सिमकार्ड

नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यानंतर मोबाईल सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमानुसार आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणे अनिवार्य केलं आहे. 1 जानेवारी 2024 पासून, तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.

 

LPG आणि CNG, PNG च्या किंमती बदलण्याची शक्यता

दर महिन्याच्या 1 तारखेला LPG आणि सह इंधनाचे नवे दर जाहिर केले जातात. 1 जानेवारी 2024 ला LPG आणि CNG, PNG चे नवे दर जाहिर केले जातील. या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

 

आयकर रिटर्न

ज्या करदात्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात ITR भरला नाही त्यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत ITR भरावा लागेल. 31 डिसेंबर 2032 पर्यंत आयकर परतावा भरताना तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे. जर करदात्यांनी इनकम टॅक्स रिटर्न भरलेला नाही तर, 1 जानेवारी 2023 पासून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

 

बँक लॉकर नियम

1 जानेवारीपासून बँक लॉकरच्या नियमांमध्येही बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँक लॉकरची (Bank Account Holder) नूतनीकरण प्रक्रिया 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नूतनीकरण प्रक्रियेत, लॉकर धारकाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. हा करार 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल.

 

डिमॅट अकाऊंट

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने डीमॅट खात्यात नामांकन (Nominee) जोडण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023 दिली आहे. ज्या खातेदारांनी नॉमिनी जोडले नसतील, त्यांची खाती 1 जानेवारी 2024 पासून गोठवली जाऊ शकतात.

 

विमा प्रीमियम महागण्याची शक्यता

2024 या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम ( Insurance Premium ) महाग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच या संदर्भातील नियोजन करुन घ्या.

 

हवाई प्रवास महागणार

नवीन वर्षात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. एअरलाइन तिकिटावरील कर 20 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

सॉफ्ट ड्रिंक्स महागणार

नववर्षात शीतपेये, फळांचा रस आणि प्लांट-बेस्ड दुधावर कर वाढणार असल्याने ही उत्पादने महाग होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -