मोदी सरकारकडून सर्वसामान्य लोकांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हे गिफ्ट देण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे महागाई कमी होणार आहे. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel) कपात करणार आहे. यासंदर्भात घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेल किमतीत (Petrol-Diesel Price Reduce) 6 ते 10 रुपये कपात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकार तेल कंपन्यांशी बोलणी करत आहेत. यापूर्वी 22 मे रोजी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर अनेक महिन्यांपासून बदलले नाही. मागील वेळेस केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात बदल करत पेट्रोलचे दर 13 रुपये तर डिझेलच्या दरात 16 रुपये कपात केली होती.तेल कंपन्यांशी चर्चा
पेट्रोलियम मंत्रालय आणि अर्थ मंत्रालयात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपातीसांदर्भात चर्चा सुरु आहे. तसेच पेट्रोलियम कंपन्यांशी चर्चा सुरु करण्यात आली आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 6 रुपये ते 10 रुपये कपात होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही महिन्यांपासून क्रूड आईलच्या दरात घसरण झाली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड आईलचे दर 80 डॉलर प्रती बॅरल आहे. यामुळे भारतीय तेल कंपन्यांना फायदा झाला आहे. आता हा फायदा सर्वसामान्य लोकांना देण्याची तयारी केंद्र सरकारने सुरु केली आहे.शिंदे सरकारने केली होती दर कपात
राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिवसेना-भाजपचे सरकार आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पेट्रोल, डिझेलवर लावण्यात येणाऱ्या व्हॅटच्या दरात कपात केली होती. व्हॅटमध्ये कपात करण्यात आल्याने त्यावेळी राज्यात पेट्रोल प्रती लिटर पाच रुपये तर डिझेल प्रती लिटर तीन रुपयांनी स्वस्त झाले होती. त्यानंतर २०२४ मध्ये पेट्रोल-डिझेल कपातीची निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात येण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांना फायदा होणार आहे.