Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगधक्कादायक! अंगावर शिंकल्याच्या रागातून मित्राचा चेहरा जाळला

धक्कादायक! अंगावर शिंकल्याच्या रागातून मित्राचा चेहरा जाळला

 

अंगावर शिंकल्याच्या(anger issues) रागातून १६ वर्षांच्या मुलाने मित्राचा चेहरा जाळल्याचा प्रकार अंधेरीत घडला आहे. जखमी मुलाला कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी १६ वर्षांच्या मुलाविरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

डीएन नगर पोलिसांनी सांगितले की, 26 डिसेंबर रोजी झालेल्या वादातून(anger issues) ही संपूर्ण घटना घडली होती. ही घटना अंधेरी (पश्चिम) येथील गोल डोंगरी रोड येथे घडली जेव्हा पीडित त्याच्या मित्रासोबत मोबाईल फोनवर गेम खेळत होता. मित्रावर सॅनिटायझरने हल्ला करून माचिसची काडी पेटवल्याप्रकरणी डीएन नगर पोलिसांनी १६ वर्षीय महाविद्यालयीन मुलाला अटक केली.

 

 

पीडित मुलगा त्याच्या मित्रासोबत मोबाईल फोनवर गेम खेळत होता. दरम्यान पीडित मुलगा मित्राच्या अंगावर शिंकला. त्यामुळे संतापलेल्या मित्राने त्याच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेकले आणि लायटरने त्याचा चेहरा जाळला. पीडित मुलाच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला, कानाला आणि मानेला जखमा झाल्या आहे. डीएन नगर पोलिसांनी सांगितलं की, मुलाला चाईल्ड वेल्फेअर कमिटीसमोर हजर करण्यात आले आणि त्याचे समुपदेशन करण्यात आले.अहवालानुसार, पीडितेचा डावा गाल, कान आणि मान वरवरच्या भाजल्या आहेत. तक्रारीत पीडितेच्या मावशीने म्हटले आहे की, तिचा भाचा त्याच्या मित्रासोबत नमाजसाठी मशिदीत गेला होता. संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा मला तो चेहऱ्यावर भाजलेल्या अवस्थेत रडत असल्याचे दिसले. त्याने सांगितले की त्याच्या मित्राने सॅनिटायझर फवारल्यानंतर आणि त्याला आग लावल्यानंतर हे घडले, तिने TOI ला सांगितले.

 

शिवाय, या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ३२६ (ए) (स्वेच्छेने अॅसिडचा वापर करून गंभीर दुखापत करणे) अंतर्गत अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -