Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगपंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल; रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल; रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले आहेत. त्याांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. धर्मपथवर त्यांचा रोड- शो केला जात आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पाहा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. काही वेळाआधी त्यांचं अयोध्येच्या विमानतळावर आगमन झालं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपरणं देत पंतप्रधानानांचं स्वागत केलं गेलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन होणार आहे. तसंच विविध कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे. 2 अमृत भारत ट्रेन आणि 6 वंदे भारत रेल्वेचं आज उद्घाटन केलं जाणार आहे.अयोध्येतील धर्मपथवर नरेंद्र मोदी यांचा सध्या रोड शो होतो आहे. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी 40 ठिकाणी मंच तयार करण्यात आले आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज आहे. 1400 हून अधिक कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत मोदींचं स्वागत करत आहेत. पारंपरिक पारंपरिक भेष गायन करत मोदींचं स्वागत केलं

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -