राशिभविष्य : मंगळवार दि. 2 जानेवारी 2024
प्रत्येक दिवशी ग्रहांच्या काही ना काही घडामोडी घडत असतात. ग्रहांची स्थिती जराही बदलली तर राशीचक्रावर परिणाम होतो. त्यामुळे ग्रहांची स्थिती अनुकूल आहे की प्रतिकूल आहे याचा अंदाज घेतला जातो. नऊ ग्रहांचा बारा राशींवर कसा परिणाम होतो यावरून त्या दिवसाचं आकलन केलं जातं. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या बारा राशींवर ग्रहांचा कसा परिणाम होईल आणि 2 जानेवारी 2024 हा दिवस कसा जाईल याचा एक अंदाज घेऊयात. दैनंदिन राशीभविष्यातून तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब, नातेसंबंध, आरोग्य आणि इतर घडामोडींचा अंदाज घेता येईल.
मेष : आजच्या दिवसात तुम्हाला संमिश्र प्रतिसाद मिळेल. पण काही गोष्टी हाताच्या राखणं गरजेचं आहे. कारण जवळच्या व्यक्तीकडून दगाफटका होऊ शकतो. जोडीदाराकडून उत्तम साथ मिळेल. मुलांच्या अभ्यासातील प्रगती पाहून खूश व्हाल. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना नोकरी मिळू शकते. आपल्यामुळे कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ : लांबचा प्रवास करण्याचा योग जुळून येईल. पण सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडा. खासगी वाहनाने शक्यतो जाणं टाळा. आपल्याच खरं हा स्वभाव सोडा. इतरांचं म्हणणं ऐकून घ्या. प्रेम प्रकरणात उलथापालथ होऊ शकते. तुमच्या स्वभावामुळे नातं तुटू शकते. कौटुंबिक स्तरावर वाद होऊ शकतो.
मिथुन : आजच्या दिवसात काही समस्यांवर तोडगा काढण्यास मदत होईल. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला राहील. पण असं असूनही काही मानसिक त्रास होईल. आपल्या मनातील दु:ख जवळच्या व्यक्तीकडे मोकळं करा. त्यामुळे तुम्हाला हलकं वाटेल. कुटुंबातील व्यक्तींना वेळ द्या. उधार घेऊ नका.
कर्क : भागीदारीच्या धंद्यात अपेक्षित यश मिळेल. पण भागीदारावर विश्वास ठेवणं महागात पडू शकतो. फायदा झाला तरी हवे तसे पैसे हाती पडणार नाही. त्यामुळे धंद्यात वैयक्तिक लक्ष घालणं महत्त्वाचं. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांनी इंटरव्यूत हवं तसं यश मिळेल. फक्त पगाराची तडजोड करताना योग्य तो निर्णय घ्यावा लागेल.
सिंह : आजचा दिवस तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची उर्जा देणारा आहे. नव्या लोकांच्या भेटीगाठी होतील. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. वाणीवर ताबा ठेवा अन्यथा मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागेल. करार निश्चित होतील आणि आर्थिक लाभ होईल.
कन्या : आजचा दिवस आर्थिक स्थिती रुळावर आणणारा आहे. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आर्थिक जोखिम घेताना काळजी घ्यावी. अन्यथा मोठा आर्थिक फटका भविष्यात बसू शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील. शिक्षकांकडून योग्य ते मार्गदर्शन घ्या आणि पुढची पावलं उचला.
तूळ : आज घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. काही गोष्टी अंगलट येऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. नवीन भागीदारी सकारात्मक परिणाम देऊ शकतात. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षित यश मिळेल.लव्हबर्ड्सने आनंदाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांना चांगली शैक्षणिक बातमी मिळू शकते.
वृश्चिक : कौटुंबिक गुंतागुंत आणि अडचणी येतील. करिअर आणि कुटुंबामुळे दबाव वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. देवदर्शनाचा योग जुळून येऊ शकतो. मानसिक समस्या निर्माण होतील. तुम्हाला भेटवस्तू किंवा काही सन्मान मिळू शकतो. वाहन खरेदीची घाई करू नका.
धनु : करिअरच्या बाबतीत दिवस ठीक राहील. करिअरमध्ये छोटासा बदल होऊ शकतो. जुन्या मित्राची भेट होईल.अनपेक्षित लाभ होण्याची दाट शक्यता आहे. मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा. विवाहासाठी उत्तम काळ आहे. कुटुंबात शुभ कार्य घडेल.
मकर : तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळा दूर होईल. त्यामुळे जीव भांड्यात पडेल. घरातील वातावरण आनंददायी होईल. तुमच्या मुलाच्या करिअरबाबत तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. तुमच्या प्रगतीच्या मार्गात काही अडथळे येत असतील तर दूर होतील. तुमच्या समस्यांबद्दल तुम्ही तुमच्या भावंडांशी बोलू शकता.
कुंभ : आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस धकाधकीचा राहील. तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही कुठे बाहेर गेलात तर तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याला नवीन नोकरी मिळू शकते. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल.
मीन : आज कामाचा ताण राहील. अनपेक्षित प्रवास करावा लागू शकतो. प्रेमसंबंधांच्या बाबतीत तुम्ही गोंधळात पडाल. नवीन अभ्यास किंवा कोणताही अभ्यासक्रम करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. कठीण प्रसंगातून हळूहळू बाहेर पडाल. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी करू नका. मालमत्तेशी निगडीत व्यवहार तडीस जाईल.