तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअॅपमधील लोकेशन शेअररिंग फिचरबद्दल माहित असेल. या फिचरच्या मदतीने युझर त्याचे रिअल टाईम लोकेशन दुसऱ्या व्यक्तीसोबत सहज शेअर करू शकतात. आता व्हॉट्सअॅपमधील या फिचरप्रमाणे गुगल मॅपने देखील एक नवे फिचर आणले आहे.आता तुम्हाला तुमचे लाईव्ह लोकेशन व्हॉट्सअॅपमधून पाठवण्याची गरज पडणार नाही. तुम्ही आता गुगल मॅपमधूनच तुमचे रिअल लोकेशन पाठवू शकता. गुगलने नुकतेच गुगल मॅपवर या सदंर्भातील नवे फिचर आणले आहे.
विशेष म्हणजे हे फिचर गुगल मॅपने थेट Android फोनमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे, युजरला आता लोकेशन शेअर करण्यासाठी वेगळे अॅप डाऊनलोड करण्याची गरज पडणार नाही.या गुगल मॅपमधील नव्या फिचरचा वापर कसा करायचा ?
सर्वात आधी तुम्ही तुमच्या Android फोनमध्ये तुमच्या गुगल अकाऊंटवरून साईन इन करा आणि गुगल मॅप हे अॅप ओपन करा.
त्यानंतर, मेनू या आयकॉनवर क्लिक करा आणि सर्च बारमध्ये तुम्हाला ज्याला रिअल लोकेशन शेअर करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव सर्च करा.
त्यानंतर, त्या व्यक्तीचा नंबर सिलेक्ट करा ज्याला तुम्हाला लोकेशन शेअर करायचे आहे.
मात्र, हे लक्षात ठेवा की, ज्या व्यक्तीला तुम्हाला लोकेशन शेअर करायचे आहे. त्या व्यक्तीचा नंबर तुमच्या Google Contacts मध्ये समाविष्ट असणे गरजेचे आहे.
गुगल मॅपमध्ये अपडेट आणण्यासोबतच कंपनी युझर्सची प्रायव्हसी सुरक्षित राहण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत कंपनी गुगल मॅपची माहिती ही क्लाऊडमध्ये साठवायची परंतु, आता युझर्सला ही माहिती फोनमध्ये स्टोअर करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्यामुळे, युझरची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहण्यास मदत होईल.