Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगवोडाफोन आयडिया युजर्ससाठी खुशखबर! Vi 5G प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सची घोषणा, जाणून...

वोडाफोन आयडिया युजर्ससाठी खुशखबर! Vi 5G प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सची घोषणा, जाणून घ्या किंमत

 

 

एयरटेल आणि रिलायन्स जिओची ५जी सर्व्हिस आल्यानंतर अलीकडेच Vodafone Idea 5G सर्व्हिस दोन शहरांमध्ये लाइव्ह करण्यात आल्याची घोषणा कंपनीच्या साइटवर करण्यात आली होती. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार आता वोडाफोन आयडियानं आपल्या 5G Recharge Plans ची घोषणा केली आहे. Vi कंपनीच्या युजर्सना कोणत्या प्लॅन्ससह ५जी स्पीडनं डेटा दिला जात आहे आणि सध्या कोणत्या लोकेशनवर विआय 5G सर्व्हिसचा लाभ घेता येईल, चला जाणून घेऊया.Vi 5G Prepaid Plans

जर तुमच्यकडे वोडाफोन आयडियाचं प्रीपेड सिम असेल आणि कंपनीच्या ५जी स्पीडचा लाभ घ्यायचा असेल तर ह्यासाठी युजर्सना Vi 478 Plan घ्यावा लागेल.Vi 5G Postpaid Plans

तसेच जर तुम्ही विआय कंपनीचे पोस्टपेड युजर असाल तर ५जी सर्व्हिससाठी REDX 1101 Plan घ्यावा लागेल. सध्या सुरुवातीला जे युजर ५जी सर्व्हिस वापरू इच्छित आहेत त्यांचा नंबर दिल्ली किंवा महाराष्ट्रात रजिस्टर असणे आवश्यक आहे.4G सिमवर मिळेल 5G सर्व्हिस

जिओ आणि एयरटेल प्रमाणेच वोडाफोन आयडियाच्या युजर्सना ५जी सर्व्हिस वापरण्यासाठी नवीन सिम घेण्याची आवश्यकता नाही, असं कंपनीनं म्हटलं आहे. म्हणजे तुम्हाला ४जी सिमवर ५जी स्पीडचा वापर करता येईल. पण त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे तुमच्याकडे ५जी स्मार्टफोन असणं आवश्यक आहे, ज्यात भारतीय ५जी बँड्सचा सपोर्ट असणं आवश्यक आहे. म्हणजे सिम जुनं असलं तरी चालेल परंतु स्मार्टफोन ५जी असणं आवश्यक आहे.

 

ह्या लोकेशनवर Vi 5G सर्व्हिस झाली उपलब्ध

अलीकडेच कंपनीच्या वेबसाइटच्या फुटर सेक्शन मध्ये सांगण्यात आलं आहे, “पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी ५जी सर्व्हिस लाइव्ह करण्यात आली आहे, जिथे भारतात विआय ५जी नेटवर्कची क्षमता अनुभवता येईल. वेबसाइटनुसार, युजर्स 5G रेडी सिमच्या मदतीनं हाय-स्पीड इंटरनेट अ‍ॅक्सेस करता येईल. परंतु ही निवडक ठिकाणं कोणती ह्याची माहिती मात्र मिळाली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -