Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगजन्मदात्या बापाने मुलीला संपवलं, पुण्यातील घटनेनं हळहळ!

जन्मदात्या बापाने मुलीला संपवलं, पुण्यातील घटनेनं हळहळ!

 

 

जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीला संपवल्याने पुण्यात (Pune News) खळबळ माजली आहे. पुण्यातील वाघोलीत (pune wagholi) वडिलाने पोटच्या मुलीची हत्या केली. पोलिसांना (police) माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.लोणीकंद पोलिसांनी (lonikand police station) बापाविरोधात गुन्हा दाखल केलाय. वडिलांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती नाही. पण वाघोली परिसरात (pune wagholi) या खूनाबद्दल चर्चा सुरु आहे.

 

बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांने मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 15 वर्षीय पोटच्या मुलीला वडिलांनी अतिशय निर्घूणपणे संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत झालेल्या मुलीचं नाव अक्षदा फकीरा दुपारगुडे असल्याचं समजतेय. दुपारगुडे हे सध्या वाघोली येथे राहतात, ते मूळचे सोलापूर येथील आहेत.

 

पोटच्या मुलीचा खून –

 

जन्मदात्या बापाने स्वतःच्या मुलीवर कुऱ्हाडीने डोक्यात, हातावर, पायावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारासाठी ससून येथे नेले जात होते, पण तिचा मृत्यू झाला. अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. वडिलाने पोटच्या मुलीला का संपवलं, याबाबतचं कारण अस्पष्ट आहे. पोलिसांकडून गुन्हादाखल –

 

याबाबत पीडित मुलीच्या मावशीच्या पतीच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस करत आहेत. आरोपी बाप फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -