Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; घरात घुसून तोडफोड ; एकावर गुन्हा दाखल

इचलकरंजी ; घरात घुसून तोडफोड ; एकावर गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम 

रेशनकार्ड डिलीट करुन धान्य बंद केल्याच्या कारणावरुन घरात घुसून शिवीगाळ करण्यासह दगड मारुन खिडकीची काच आणि टिव्ही फोडून २५ हजाराचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी अनिल दत्तात्रय उनउने (वय ४६ रा. आसरानगर) याच्यावर गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून नंदा सुर्याजी साळुंखे (वय ५५ रा. मथुरानगर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रेशनकार्ड डिलीट करुन धान्य बंद केल्याच्या रागातून अनिल उनउने याने नंदा साळुंखे यांच्या घरात घुसून खिडकीची काच आणि टिव्हीवर दगड मारुन तोडफोड केली. तसेच धान्य बंद का केले असे म्हणत साळुंखे यांना शिवीगाळ करत डोक्यात दगड घालतो अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमुद केले आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -