भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख ठरली, T20 World Cup मध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक पाहा
क्रिकेटसाठी 2023 हे वर्ष महत्त्वाचं ठरलं. याच वर्षात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पार पडली. आता नव्या वर्षात क्रिकेट चाहत्यांना टी20 विश्वचषकाची मेजवाणी मिळणार आहे. गेल्या बारा वर्षात टीम इंडिया एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. आता आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची चांगली संधी टीम इंडियाकडे आहे. यावर्षी जून महिन्यात टी20 विश्वचषक स्पर्धा पार पडणार असून वेस्ट इंडिज आणि अमिरेकेत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं लवकरच वेळापत्रकही जाहीर केलं जाईल. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघाचं वेळापत्रक कळलं आहे.
आयसीसी टी20 विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर स्पर्धेतला दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 9 जूनला भारत आणि पाकिस्तान खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 12 जूनला यजमान अमेरिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. हे तीनही सामने न्यूयॉर्कमधले खेळवले जाणार आहेत. अखेरच्या क्षणी वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.