Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगजिवलग मित्राने केली धोनीची फसवणूक; तब्बल 15 कोटी रुपयांचे नुकसान

जिवलग मित्राने केली धोनीची फसवणूक; तब्बल 15 कोटी रुपयांचे नुकसान

 

 

आपल्या प्रगतिशील भारतात आजही फसवणूक आणि गुन्हेगारीचे प्रमाण कमी झालेले नाही. केवळ सामान्य माणसंच नाही तर मोठमोठाल्या सेलिब्रेटीजना देखील ही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं लाखो आणि करोडो रुपयांचा गंडा घालीत आहेत. यामध्ये भारताचा माजी कर्णधार आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनी चाही समावेश झाला आहे.

महेंद्रसिंग धोनी उर्फ माही हा नेहमीच त्याच्या नियोजन पद्धतीमुळे आणि उत्तम विचारशक्तीसाठी ओळखला जातो. मात्र एवढ्या चतुर माणसाला ही कधीतरी अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडावं लागेल यावर आपला विश्वास बसणार नाही. मात्र क्रिकेटच्या मैदानात उत्तम विकेट कीपिंग करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला एक मोठा झटका बसला आहे.

सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार एका बिझनेस मध्ये महेंद्रसिंग धोनीला तब्बल 15 कोटी रुपयांच्या फसवणुकीला तोंड द्यावे लागले आहे. धोनीच्या एका जून्या बिझनेस पार्टनर कडून ही फसवणूक केली गेली असून, आता त्याच्या विरोधात धोनीने त्वरित तक्रार नोंदवली आहे.धोनीची फसवणूक कोणी केली? (MS DHONI FRAUD CASE)

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार महेंद्रसिंग धोनी सोबत फसवणूक करणारी कंपनी एक स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी आहे, या कंपनीचे नाव Aarka Sports Management असे असून धोनीने 15 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करत त्यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.

महेंद्रसिंग धोनी यांच्या वकिलाने सादर केलेल्या माहितीनुसार पूर्व कर्णधार आणि कंपनीच्या मालकाने केलेला एक करार फसला, आणि याच्याच परिणामी धोनीला 15 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. धोनी आणि Aarka Sports Management यांच्यातील करार जागतिक क्रिकेट अकादमी स्थापन करण्याबाबत होता. करारानुसार, कंपनी फ्रँचायझी फी भरण्यास जबाबदार होती आणि कंपनीने धोनीला नफ्यातही हिस्सा द्यायचा होता. धोनीच्या वकिलाचा दावा आहे की कंपनीने करारातील (MS Dhoni Fraud Case) या अटी पूर्ण केल्या नाहीत आणि व्यावसायिक संबंध तोडले आहेत.काय आहे एकूण प्रकरण?

असं म्हटलं जातं की भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कडून Aarka Sports Management चे मिहीर दिवाकर आणि सौम्या विश्वास यांच्याविरुद्ध रांची कोर्टात फौजदारीचा खटला दाखल करण्यात आला आहे. मिहीर दिवाकर हा धोनीचा एक जिवलग मित्र तसेच त्याचा बिजनेस पार्टनर असल्याचं सांगितलं जातंय.

वर्ष 2017 मध्ये या दोघांनी सोबत येऊन जगभरात एक क्रिकेट अकादमी उघडण्याचा करार केला होता, मात्र दिवाकर कडून करारनाम्यातील नमूद केलेल्या अटी पाळल्याने न गेल्याने आरकोस्पोर्टला अधिक शुल्क भरावे लागले. या सोबतच करारानुसार अकादमीचा होणारा नफा हा दोघांनी वाटून घ्यायचा होता परंतु दिवाकर कडून सर्व अटी कायमच्या झूगारल्या गेल्या.

 

याच्याच परिणामी महेंद्रसिंग धोनीने 2021 मध्ये Aarka Sports Management चे अथोरिटी लेटर मागे घेतले होते, त्यांनी कंपनीला काही कायदेशीर नोटीस देखील पाठवल्या पण त्याचं काहीही उत्तर कंपनीकडून परत आलं नाही.

आता महेंद्रसिंग धोनी यांचे वकील दयानंद सिंह यांनी दावा केला आहे की Aarka Sports Management ने माजी कर्णधाराची फसवणूक (MS Dhoni Fraud Case) केली असून धोनीला 15 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. आता या सर्व प्रकरणाच्या शेवटी नेमका काय निकाल जाहीर होतो?? धोनीला नुकसान भरपाई मिळेल का हे पाहण्यासाठी अनेकांच्या नजरा उत्सुक असतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -