Monday, April 22, 2024
Homenewsमुंबईवर होणार होती दोन विमानांची टक्कर,

मुंबईवर होणार होती दोन विमानांची टक्कर,

विमान दुर्घटना तपासणी ब्युरे (AAIB) च्या रिपोर्टमध्ये अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. यांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी एक धक्कादायक प्रकार घडला असता. मिळालेल्या माहितीनुसार 29 जानेवारी रोजी एअर इंडियाची अहमदाबाद – चेन्नई फ्लाइट आणि इंडिगोची बंगलुरू – वडोदरा फ्लाइट यांची एकमेकांना टक्कर होता होता वाचली. रिपोर्टनुसार, ही दोन्ही विमानं आठ किमीच्या अंतराच्या आत होते. मुंबई विमानतळावराच्या वर आकाशात अवघ्या 300 फूटाचं अंतर होतं.

दोन्ही विमानांमध्ये अवघ्या 8 किमीचं अंतर होतं. अहमदाबाद ते चेन्नई असा प्रवास करणारं विमान सर्वसाधारणतः भावनगरवरून प्रवास करतं. पण, त्यादिवशी या विमानाने जी विमानं मुंबईमध्ये थांबा घेऊन पुढे जातात, त्या विमानांचा मार्ग निवडला होता.

या मार्गावरच नेमकं बेंगळुरूहून बडोद्याला जाणारं इंडिगोचं विमानही समोरून येत होतं. त्याचा मार्ग देखील भरूचजवळून जात होता. त्यामुळे ही दोन्ही विमानं मुंबईवरील आकाशात एकाच मार्गावर समोरासमोर प्रवास करत होती. सुदैवाने मुंबईच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलिंग विभागाने वेळीच धोक्याचा इशारा दिला. पण, रडार नियंत्रकाला हा इशारा कळला नाही.

जोवर नियंत्रकाला हा इशारा कळला, तोपर्यंत ही विमानं आमनेसामने आली होती. त्यांच्यात अवघं आठ किमी इतकं अंतर राहिलं होतं. सुदैवाने एअर एशियाच्या वैमानिकाने धोक्याचा इशारा समजून ते विमान आणखी काही किमी वर नेलं. तेव्हाही दोन्ही विमानांत अवघं 300 फुटांचं अंतर होतं. सुदैवाने दोन्ही विमानांनी आपला मार्ग बदलल्यामुळे हा भीषण अपघात टळला.

या प्रसंगानंतर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या चौकशी समितीच्या अहवालात या प्रसंगाची माहिती नमूद करण्यात आली. हवाई वाहतूक नियंत्रण विभागात कोरोना लॉकडाऊननंतर कर्मचाऱ्यांच्या कमी संख्येमुळे हा प्रसंग ओढवल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -