इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजसाठी सुरुवातीच्या दोन टेस्ट मॅचसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने शुक्रवारी 12 जानेवारीच्या रात्री पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट मॅचसाठी 16 सदस्यीय स्कवॉडची घोषणा केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जे खेळाडू टीमचा भाग होते, त्यातल्या बहुतांश खेळाडूंची इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन टेस्टसाठी निवड करण्यात आली आहे.
सिलेक्शन कमिटीने सर्वांनाच धक्का देत उत्तर प्रदेशचा विकेटकीपर ध्रुव जुरैलची टीम इंडियात निवड केली आहे. तो पहिल्यांदा ड्रेसिंग रुमचा भाग असेल.भारत आणि इंग्लंडमध्ये पाच टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. याची सुरुवात 25 जानेवारीला होईल. 11 मार्चपर्यंत ही सीरीज खेळली जाणार आहे. हा मोठा दौरा असल्याने बीसीसीआयने पहिल्या दोन टेस्टसाठीच टीम निवडली आहे. पहिला कसोटी सामना 25 जानेवारीला हैदराबादमध्ये खेळला जाईल. दुसरी टेस्ट मॅच 2 फेब्रुवारीला विशाखापट्टनममध्ये होणार आहे.मोहम्मद शमीला का नाही निवडलं?
सीनियर सिलेक्शन कमिटीने दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरीजमधील बहुतांश खेळाडूंना संधी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत डेब्यु करणारा प्रसिद्ध कृष्णा आणि ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर यांना ड्रॉप केलय. दोघांनी दक्षिण आफ्रिकेत अपेक्षित प्रदर्शन केलं नाही. मोहम्मद शमी अजूनही पूर्ण फिट नाहीय, त्यामुळे त्याला निवडलेलं नाही. तो तिसऱ्या कसोटीपासून टीम इंडियाचा भाग असू शकतो.
त्याला नाहीच निवडलं
इशान किशनला टीम इंडियात स्थान मिळणार की, नाही? याकडे लक्ष होतं. मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमधून त्याने आपल नाव मागे घेतलं होतं. इशानने मानसिक थकव्याच कारण देऊन ब्रेक घेतला होता. त्याला अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी सुद्धा निवडलं नाही. निदान त्याला टेस्टसाठी संधी मिळेल अशी अपेक्षा होती.
पहिल्या-दुसऱ्या टेस्टसाठी स्क्वॉड
रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरैल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.