Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीराज्यातील भाजपचे दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात ? ही आहेत नावे

राज्यातील भाजपचे दिग्गज नेते लोकसभेच्या रिंगणात ? ही आहेत नावे

 

 

भारतीय जनता पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. लोकसभेत महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून येण्याची रणनीती तयार केली जात आहे. त्यासाठी राज्यातील दिग्गज मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्यात येणार आहे.देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सध्या दिल्लीतील तापमान नीचांकावर आले आहे. परंतु भाजपमधील वातावरण लोकसभा निवडणुकीमुळे गरम होऊ लागले आहे. मंगळवारी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणुकीची तयारी करण्यात येणार आहे. त्यासाठी रणनीती निश्चित करण्यात येणार आहे.राज्यातील काही मोठ्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु झाली. सकाळी 11.30 वाजता बैठक सुरु होणार आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत अनेक खासदारांना विधानसभा निवडणुकीत भाजपने उतरवले होते.भाजपचे दिग्गज दिल्लीत दाखल

भाजपचे दिग्गज नेते, मंत्री दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहे. त्यात राज्यातील मंत्री आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लोकसभेचे रण लढण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात येणार आहे.बैठकीस दिग्गांची उपस्थिती

बैठकीस क्लस्टर प्रभारींना बोलवण्यात आले आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रात मिशन ४५ साठी दिग्गज नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश पक्षातून देण्यात येणार आहे. शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप मिळून राज्यातील ४८ जागा लढणार आहे. लोकसभेच्या भाजप 32 जागा लढवणार आहे. भाजपच्या बैठकीत त्या 32 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आजित पवार गट 16 जागा लढवणार असल्याची माहिती आहे. त्यात आजीत पवार गट 6 तर शिंदे शिवसेना 10 जागा लढवणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.राज्यातील बड्या नेत्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले जाणार असताना अनेकांची इच्छा राज्यात राहण्याची आहे. परंतु पक्षातून आदेश मिळाल्यावर हे नेते लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -