Tuesday, November 25, 2025
Homeराशी-भविष्यउद्यापासून मंगळाच्या स्थितीत मोठा उलटफेर, या तीन राशींचं टेन्शन वाढणार

उद्यापासून मंगळाच्या स्थितीत मोठा उलटफेर, या तीन राशींचं टेन्शन वाढणार

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या ग्रहाच्या स्थितीत किंचितसा जरी बदल झाला तरी राशीचक्रावर प्रभाव दिसून येतो. ग्रहांचं गोचर राशींसोबत नक्षत्रातून होत असतं. ग्रह नक्षत्राच्या कोणत्या चरणात विराजमान आहे. इथपासून ग्रह कोणत्या राशीत ठाण मांडून आहे काय बदल होत आहे इथपर्यंत सर्वकाही महत्त्वाचं ठरतं. मंगळ हा ग्रह साहस आणि शौर्याचं प्रतिक आहे. 12 तासानंतर मंगळ ग्रह धनु राशीत उदीत होणार आहे. मंगळ ग्रह धनु राशीत 5 फेब्रुवारीपर्यंत राहाणार आहे. त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल. त्यामुळे धनु, मेष आणि मीन राशीच्या जातकांना शुभ फळं अनुभवता येतील. मात्र तीन राशींच्या जातकांना मंगळाची स्थिती घातक ठरू शकते. खासकरून सप्तम भावातील मंगळ पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण करतो.

तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ
कन्या- कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात मंगळ उदीत होणार आहे. त्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपल्यासोबत काहीच ठिक होत नाही याची जाणीव होईल. नकारात्मक शक्तींचा सामना या कालावधीत करावा लागू शकतो. काही संकटं समोर आव्हानं उभी करतील. अनावश्यक वाद करणं टाळा. तसेच नात्यामध्ये सुसंवाद ठेवा. उगाचच वाद करणं टाळा. हनुमान मंदिरात नियमितपमे हनुमान चालिसाचा पाठ करा.

सिंह- मंगळ ग्रह या राशीच्या पंचम स्थानात उदीत होत आहे. त्यामुळे काही अनपेक्षित बदल दिसतील. अपचन, पोटदुखी, पित्ताशीसंबंधित आजारांना सामोरं जावं लागेल. आपल्या तब्येतीकडे लक्ष ठेवा. मंगळाच्या प्रभावामुळे स्वभावात कणखरपणा येईल. आपल्या बोलण्याने एखादी व्यक्ती दुखवू शकते. पत्नीसोबत वाद होऊ शकतो. आर्थिक समस्या उद्भवू शकते. कडुलिंबाचं झाड लावा आणि पितरांचं श्राद्ध करा.

मिथुन- या राशीच्या सप्तम स्थानात मंगळ उदीत होणार आहे. त्यामुळे सर्वाधिक प्रभाव नातेसंबंधात निर्माण होईल. जोडीदार किंवा पालकांसोबत कडक्याचं भांडण होऊ शकतं. आपल्याकडील गुपित एखाद्याला सांगणं टाळा. त्याचा गैरफायदा घेऊन आपल्याला कोंडीत पकडलं जाईल. जवळच्या व्यक्तींकडून दगाफटका होण्याची शक्यता आहे. मंदिरात किंवा आश्रमात मिठाई किंवा खाद्यपदार्थाचं दान करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -