Tuesday, February 27, 2024
Homeसांगलीप्रेम प्रकरणातून सांगलीत घरात घुसून मुलीचे अपहरण

प्रेम प्रकरणातून सांगलीत घरात घुसून मुलीचे अपहरण

एकतर्फी प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीचे तिच्या घरात घुसून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्रामागे घडला. मुलीच्या आईने प्रतिकार करताच त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला.स्थानिक गुन्हे अन्वेषण व शहर पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या 12 तासांत छडा लावून पाच संशयितांना कर्नाटकात अटक केली, तसेच मुलीची सुखरूप सुटका केली.

 

अटक केलेल्यांमध्ये समर्थ भारत पवार (वय 22, रा. राजीव गांधीनगर, जुना बुधगाव रोड), राहुल संजय साळुंखे (19, सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी), आदित्य गणेश पवार (20, पंत मंदिरजवळ, जामवाडी), शुभम नामदेव पवार (22, श्रीनिवास अपार्टमेंट, गावभाग, सांगली) यांचा समावेश आहे. पाचवा संशयित अल्पवयीन आहे.

 

संशयितांनी मुलीच्या आजोबांना ढकलून दिले. त्यानंतर ते घरात शिरले. मुलीला ताब्यात घेऊन ते बाहेर पडत होते. तेवढ्यात मुलीच्या आईने प्रतिकार केला. त्यावेळी एकाने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला.मुलीची आई रक्ताच्या थारोळ्यात पडताच संशयितांनी मुलीला ताब्यात घेतले. तिला कारमधून (एमएच 10 सीएक्स 6797) नेले. मुलीच्या आईला रुग्णालयात दाखल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -