Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगरामलल्ला अयोध्येत होणार विराजमान! हे 5 दमदार शेअर तुमच्याकडे आहेत का?

रामलल्ला अयोध्येत होणार विराजमान! हे 5 दमदार शेअर तुमच्याकडे आहेत का?

 

 

सोमवारी, 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येईल. अयोध्या आता धार्मिक राजधानी होणार आहे. जगभरातील भाविक भक्त अयोध्येकडे कूच करत आहेत, अयोध्येत वेगाने विकास कामे सुरु आहे. सेवा क्षेत्रात मोठ्या उलाढाली सुरु आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारात दिसून येत आहे. विकास आणि सेवा क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या शेअरमध्ये तुफान आले आहे. प्राण प्रतिष्ठेनंतर हे शेअर रॉकेट सारखी घौडदौड करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड – राम मंदिरात दर्शनासाठी अयोध्येत काही दिवसांतच लाखो भाविक भक्त येतील. दरवर्षी हा आकडा कोट्यवधीच्या घरात जाईल. टाटा समूहाची हॉस्पिटॅलिटी कंपनी इंडियन हॉटल लिमिटेडने अयोध्येत दोन आलिशान हॉटेल तयार करण्याची योजना आखली आहे. Indian Hotels Company Share मध्ये तुफान तेजीचे सत्र आहे. हा शेअर 4.18 टक्क्यांनी उसळून 483 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या एका महिन्यात 13 टक्के, सहा महिन्यात 23 टक्के, एका वर्षात 62 टक्के, तर पाच वर्षांत 262 टक्क्यांचा रिटर्न दिला.

लार्सन अँड टुब्रो – लार्सन अँड टुब्रो कंपनीचा शेअर सध्या तेजीत आहे. या कंपनीला राम मंदिर तयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 4.99 लाख कोटी रुपये आहे. टाटा समूहातील कंपनी Tata Consultancy Engineers पण या विकास कामात सहभागी आहे. एलअँडटीचा स्टॉक 1.15 टक्क्यांनी उसळला असून तो सध्या 3627.40 रुपयांवर बंद झाला. सहा महिन्यात या शेअरने 47 टक्के, एका वर्षात 63 टक्के परतावा दिला.

प्रवेग लिमिटेड – Praveg Ltd Share च्या गुंतवणूकदारांना पण फायदा झाला आहे. ही कंपनी लक्झरी टेन्ट सिटी तयार करत आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 2440 कोटी रुपये आहे. या कंपनीने आलिशान रिसॉर्ट पण उभारले आहे. लक्षद्वीपमध्ये पण टेन्ट सिटी उभारण्यात येत आहे. कंपनीने एका वर्षात 63 रिटर्न परतावा दिला. एका वर्षात 200 टक्के, पाच वर्षात 44,000 टक्के परतावा दिला.

IRCTC Limited – आयआरसीटीसीच्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले. रेल्वेच्या सेवांशी संबंधित या कंपनीने शनिवारच्या विशेष सत्रात 10.70 टक्क्यांची तेजीन नोंदवली. हा शेअर 1026.40 रुपयांवर आहे. तिकिट बुकिंगसह अनेक सुविधा ही कंपनी देते. IRCTC शेअरने एका महिन्यात 19 टक्के, सहा महिन्यात 65 टक्के, तर पाच वर्षांत 558 टक्के रिटर्न दिला.अपोलो सिंदुरी हॉटेल – नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील अपोलो सिंदुरी हॉटेलचा शेअर दमदार ठरला आहे. एका महिन्यात या शेअरमध्ये 48 टक्के, सहा महिन्यात 74 टक्के, एका वर्षांत 78 टक्के तर पाच वर्षांत 140 टक्क्यांची तेजी दिसून आली. हा शेअर सध्या 2285 रुपयांवर ट्रेड करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -