Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगPhonePe ने केला नवा विक्रम! paytm आणि google pay ला टाकले मागे

PhonePe ने केला नवा विक्रम! paytm आणि google pay ला टाकले मागे

डिजिटल पेमेंटसाठी वापरल्या जाणारे अॅप PhonePe ने एक नवा विक्रम केला आहे. फोन पे कंपनीने सप्टेंबर 2021 पासून विमा ब्रोकिंग परवाना मिळाल्यानंतर एकूण ९० लाख पॉलिसी विकल्या आहेत. यापैकी सुमारे ४० लाख एकट्या गेल्या वर्षी विकले गेले आहेत. PhonePe ने 2020 मध्ये विमा क्षेत्रात प्रवेश केलाय.

कॉर्पोरेट एजन्सीचा परवाना मिळाल्यानंतर कंपनीने या क्षेत्रात पाऊल टाकले होते.विमा ब्रोकिंग परवाना मिळण्यापूर्वीच PhonePe बाजारात आला होता. फोन पे सध्या जीवन, आरोग्य, मोटर आणि कार विमा विकते. युजर येथे मासिक सदस्यता घेऊन त्याचे फायदे घेऊ शकतात. PhonePe इन्शुरन्सचे पदाधिकारी विशाल गुप्ता म्हणाले की, ‘आम्ही लोकांना विम्याची सखोल माहिती पुरवतो. त्याच्या मदतीने, त्यांना पॉलिसी खरेदी करणे खूप सोपे जाते.

 

Axis बँकेसोबत भागीदारीचा विचार

PhonePe साठी आता विमा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कारण डिजिटल पेमेंटमधून मिळणारा महसूल खूप महत्त्वाचा आहे. कंपनीने गेल्या नोव्हेंबरमध्ये समूह रचना तयार केली होती. त्याची हेड, कमाई आणि नफा यानुसार विभागणी केली जाते. यावर कंपनी ग्राहक क्रेडिट सुरू करण्याच्या विचारात आहे.

या सेवेसाठी अॅक्सिस बँकेसोबत भागीदारी करण्याचाही विचार करत आहे.PhonePe मध्ये अनेक बदल होत गेले. PhonePe द्वारे आता आंतरराष्ट्रीय UPI सेवा देखील पुरवली जात आहे. ज्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यवहार देखील केले जात आहेत. सिंगापूरबाबत पेटीएमने आधी आंतरराष्ट्रीय व्यवहारांची सुरुवात केली होती. त्यानंतर फोन पे आणि मग गुगल पे ने देखील याची सुरुवात केली आहे. यामुळे युजर्सना पेमेंट करताना किंवा स्वीकारताना मोठी मदत होत आहे.

 

ACKO आणि PhonePe यांच्यात भागीदारी

ACKO आणि PhonePe यांच्यात भागीदारी देखील झाली आहे. दोन्ही कंपन्या ग्राहकांना एकत्र सेवा देत आहेत. ACKO जनरल इन्शुरन्स आणि PhonePe भारताच्या विमा प्रवेशामध्ये परिवर्तन करण्यासाठी एकत्र आले आहेत. PhonePe प्लॅटफॉर्मद्वारे ते थेट कार आणि बाईक विम्याची विविध श्रेणी ऑफर करत आहेत. पेटीएम, गुगल पे आणि फोन पे या तीन कंपन्या भारतात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजीटल पेमेंट सोल्यूशन कंपन्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -